STORYMIRROR

Aarya S

Others

2  

Aarya S

Others

बालपणाला कायम ठेवू

बालपणाला कायम ठेवू

1 min
116

हरवलेले बालपण ते

पुन्हा परत मिळेल का,

लवकरच का मोठे झालो

उत्तर याचे कळेल का. 


कुठे हरवली चूल बोळकी

कुठे हरवली भातुकली,

कुठे हरवली गोड बाहुली

शोधू तरी मी तिला किती.  


कुठे हरविले दप्तर माझे 

गेली कुणीकडे ती पाटी, 

शोध शोधूनि आता थकले 

नजरेला तरी ते ना दिसले. 


सांडुनी गेली चिंचा बोरे 

राहीले हाती कागद कोरे, 

पकडा पकडी आणी लगोरी 

खेळांमध्ये मन ही अडकले. 


परतुनी येईल का ते जीवन 

परतुनी मिळतील का ते ही क्षण, 

येईल का तरी पुन्हा खेळता

सोडूनि सगळ्या काळजी चिन्ता 


झालो मोठे पाटी फुटली  

पोटासाठी माती सुटली, 

कामामध्ये गुंतून पडले 

दप्तरी तरी मन हे अडकले. 


आठवणींची तत्पर सेवा 

बालपणीचा मिळतो ठेवा, 

त्या ठेव्यातच रमून जाऊ 

बालपणाला कायम ठेवू. 


Rate this content
Log in