बालपण
बालपण
बालपणीच जीवन
खरच होत मस्त ।
नव्हती कसली जबाबदारी
बोलणं होत बिनधास्त।
शाळा ते घर
असा होता रस्ता
भाजी पोळी जेवण होत
कसलं बदाम काजू पिस्ता।
आढे वेढे घेत नसे कधी मन
सगळेच होते आपले
जीव लावणारे,
सांगाना परके होते कोण।
शाळेत देखील पहिलीपासून
10 वी पर्यंत शिक्षकाच्या वसंगळी
घालून द्यायचे आई वडील।
कसली पालक सभा आणि
निकालाच्या वेळेस नव्हती गर्दी।
1 मे ला असायचा आमचा निकाल।
वेळ मिळेल तस एकटच जायच
नव्हती जास्त स्पर्धा ,कोणाचाही असो नंबर पहिला यायचा।
पास लिहिलेलं बघण्यातच आनंद मोठा असायचा।
हल्ली तर स्पर्धाच इतकी झाली
एक मार्कस कमी पडला तरी आई बाबा नाराज होती।
दप्तराच्या ओझ्याने बालपण सार दबून गेलं।
बदाम काजू खाऊन
लेकरू अति हुशार झालं।
अभ्यास चांगला करा मुलांनो
नका घेऊ कोणत्या गोष्टीचा लोड
एवढंच लक्षात ठेवा
बालपण असते निःस्वार्थी आणि खरच किती सुंदर अनमोल
