बालपण ...
बालपण ...
काय ते दिवस होते गेले ते दिवस राहिल्या फक्त आठवणी ...
आनंदित जगणं ते फक्त बालपणीच ...
इवल्याशा उंचीत इवलसं जगणं ...
मनसोक्त बागडणं नाही दुहेरी वागणं ...
आईच्या हातातला घास चिऊ काऊना बरोबर घेऊन खाणं ...
आणी गुपचूप आईच्या अंगाईने तिच्या कुशीत झोपी जाणं ...
चॉकलेटही मिळे खूप सारी ...
दात किडतील म्हणून आई लपून ठेवी सारी ..
मग त्या चॉकलेट साठी रडारड चालू ..
आई मग देई एक लाडू ...
इवलाश्या त्या जगात सुखी होतो उगाच वाटत मोठे झालो ..
त्या जगात राग गर्व तिरस्काराचा नव्हता गंध ...
फक्त आनंदित हसत राहण्यात होतो मग्न ...
टेन्शनच्या गावाचा पत्ताच माहित नव्हता त्या वेळी ...
मामाच्या गावी जायचो आम्ही दर सुटीच्या वेळी ...
तेव्हाचे किस्से आठवले की येते हसू ....
काय मस्त जगत होतो आणि काय जगतोय मन लागत विचार करू ...
पकडापकडी लपंडावात खेळताना येई मज्जा ...
आता मात्र लोकांचे पकडापकडीचे लपंडावाचे स्वभाव पाहून होते मनाला सजा ...
त्या दिवसाच्या आठवणीचा आहे आपल्या मनात ठेवा ...
म्हणून मन म्हणते लहानपण देगा देवा....
