बालपण ...
बालपण ...
निरागसतेचे देणे ,बालपण आमुचे
आता फिरकुनही पाहत नाही, ते दिन सोनियाचे
खळाळणारी नदी जशी, हास्य तयाचे
उर्जा संचारलेली असते, उचापती करायचे ...
खेळुण खेळूण ,भारी दमायचे
धाप लागली तरी ,स्वस्थ न बसायचे
मिळेल ते ,भरकण खायचे
पुन्हा जुना खेळ ,नव्याने खेळायचे ...
लहान लहान गोष्टीत, आंनद शोधायचे
पैशाच्या आकड्याचा फरक, न ओळखायचे
नवीन खेळण सोडुन ,टपरासाठी भांडायचे
कितीही भांडल तरी ,पुन्हा मिळायचे ...
आता ते बालपण ,पुन्हा येणे नाही
भूतकाळात रमून ,त्याच्यावर लिहायचे
लिहीता लिहीता ,भावूक व्हायचे
आई-बाबाना आठवून, अश्रू गाळायचे ...
