बालपण
बालपण
1 min
283
मोठं झाल्यावर बदलून जातं सारं काही
बालपण मात्र विसरून जाता येत नाही
राहिल्या आहेत फक्त त्या सुंदर आठवणी
सारं आठवून येत डोळ्यात नकळत पाणी
नाही कोणाशी भांडण अन् नाही कोणाशी वैर
लहानपणी वागण्यात आपल्या काहीच नव्हतं गैर
पावसाच्या पाण्यात कागदाची नाव सोडणं
अन् आई ओरडेपर्यंत चिंब मनसोक्त भिजणं
शाळा सुटल्यावर जाऊन चिंचा अन् बोरं खायचं
मित्रमैत्रिणींसोबत गप्पा अन् उड्या मारत घरी जायचं
ना कसली भिती अन् ना कसली चिंता
येत होतं आयुष्य मनमोकळं जगता
जाता येईल का पुन्हा एकदा बालपणी
अन् साठवता येतील का त्या मौल्यवान आठवणी
