बालपण
बालपण
1 min
177
बालपण मिळाले नाही म्हणून
खंत करत बसायचे नाही
हसा, रडा, पळा,धडपडा,
उडया मारा, खेळा,
उगीचच मोठे
हे मनावर ओढवून
घेतलेले बंधन टाकून दया
लक्षात ठेेवा हे जग
आपल्यासाठी आहे
आणि
आपल्यामुळे आहे
आपण जगासाठी नाही
आपल्या शाळेतल्या दप्तरासारखे
अख्या जगाचे ओझे
आपल्याच पाठीवर आहे
असे समजू नका.
बालपण हे बालपण असतं
आपली जबाबदारी
आपणच ओळखले पाहिजे
हे लक्षात असू द्या...
