बालपण
बालपण
बालपण म्हणजे सकाळपासून
आईने उठण्यासाठी मागे लागणे ।
उठल्यावर ब्रशला कोलगेट लावून
ते लगेच खाऊन संपून टाकणे।
बालपण म्हणजे घाई घाई
सदऱ्याचे बटन खालीवर लावणे
शाळेत सगळ्यांनी हसणे ।
नंतर बाईणीचं सर्व बटन व्यवस्थित लावून देणे।
बालपण म्हणजे पाटीवरच्या
पेन्सिलचा हळूच तुकडा मोडून खाणे।
हळूहळू ती पेन्सिल आपोआप कमी कमी होत जाणे।
घरी आल्यावर खेळायला मित्रांनी
आवाज देणे ।
दप्तर फेकले की क्षणाचा विलंब न करता चप्पल उलटी सुलटी होणे, तरीही तसेच पळत सुटणे।
लहानपणी भूक लागली की जेवायला न लाजने।
दुष्काळातून आंणल्यासारखं गपागप सर्व संपवणे।
पाऊस आला की सुट्टीची बहाणे,
घरी राहून पावसात भिजणे, होड्या बनवणे,पाणी उडवणे
घरात आलं की आईचे हातचे रागाने धपाटे खाणे ।
खरच बालपणीचा काळ सुखाचा
आईच्या कुशीत बेफिकीर विसाव्याचा।
