STORYMIRROR

अमोल धों सुर्यवंशी

Others

4  

अमोल धों सुर्यवंशी

Others

बालपण

बालपण

1 min
172

हुंबरटाच्या आतले जग

आड्यावरचा झोपाळा

घोंघड्यावरचे खेळ

उतवावरील तूप आणि दुध

बालपण एक गोजिरवाणं फुल

मांडीवर घेऊन आई

पेटवत असे चूल


अंगण हे पाऊलांची चाहूल

वृंदावन मायचे तिथे स्थल

कोयना मायचे वाहे जल

मांडे दिवस रात्र तिथे खेळ


शाळेचा तो पहिला दिन

नवा गणवेश नवे ठिकाण

जणू रडण्या रूसण्याचा तो सण

काळ्या पाटीवर पेन्सिलने रेखाटन

हळूहळू वहीवर ते लिहीणं


शाळा हा पिंजरा मुक्तछंदाचा

गुरूजींच्या काठीचा आवाज धाकाचा

शाळेतून पळून गेलो की तो दिवस मस्तीचा

मित्रांबरोबर दिवस सारा खपवायचा

खेळ खेळत खेळ नाही संपवायचा


उगाच मोठा जबाबदार झालो

जगण्याचा वाटा दुसऱ्याच्या

पावलावर चाललो

ते बालपण मागे सारून

मी झुरत बसलो

का मी मोठा झालो?


Rate this content
Log in