STORYMIRROR

bhavana bhalerao

Others

4  

bhavana bhalerao

Others

बालपण

बालपण

1 min
154

दहा ..वीस..तीस..चाळीस..

लपले का पन्नास..साठ..सत्तर..

अरे लपले का सगळे ऐंशी..नव्वद....

आणि..... शंभर.....

पुन्हा एकदा शोधतोय ..

मी हरवलेले बालपण , ते खोखो, कबड्डी

अन पत्यांचे रंगत गेलेले ङाव,

तो चार आण्याचा पाव

अन पाण्यात सोडलेली कागदी नाव. मटक्यातली गारेगार कुल्फी,

हातावरचे पिवळे पोंगे,

आईचा मार खातांनाची सगळी सोंगे.

वागळे की दुनिया ,फास्टर फेणे,

रामायण ,महाभारत,गोट्या, मालगुङी ङेज्

,हेच होते जिणे,

ती रंग उङालेली शाळा,

मराठीच्या बाईंचा खुप होता लळा

, गावभर फिरत, विहिरीत उङी,

भुक लागली की आजींच्या हातची तिळवङी,

रात्रपारीला भित भित ऐकलेल्या भुतांच्या गप्पागोष्टी

सगळ सगळं आठवतंय बालपण, मनात कोरलेले कित्येक क्षण..

आयुष्यातला सगळ्यात मोठा एकमेव मोठा सण ..

देईल का शोधुन कुणी मला माझ हरवलेल बालपण.


இந்த உள்ளடக்கத்தை மதிப்பிடவும்
உள்நுழை