बालपण
बालपण
1 min
183
इवलेसे घर माझे
डोंगराच्या कुशीत
ऊन वारा पाऊस
सारे काही सोशीत॥1॥
पडतोय सारखा
रिमझिम पाऊस
जीव घाबरा होई
कधी यायची आऊस ॥2॥
घराच्या भोवती
जमलाय गाव सारा
किल्ले बनवू शाळा भरवू
गाईला घालू चारा ॥3॥
बालपण आठवता
गाव राहतो उभा
राम्या नाम्या दादू
रंगतात आमच्या सभा ॥4॥
बालपणीचा काळ सुखाचा
म्हणतात बघा सारे
जपून ठेवल्या आठवणी
जणू आकाशातील तारे ॥5॥
