STORYMIRROR

Ashok Kulkarni

Others

4  

Ashok Kulkarni

Others

बालपण निसटून गेलेलं

बालपण निसटून गेलेलं

1 min
415


कठीण नव्हती वाट बिलकूल।

संबंध नव्हता या जगाशी देखील।

तणावरहित होत एक सुंदर मन। 

किती अनमोल होत ते बालपण।।


किती निरागस होते ते क्षण।

किती सुंदर होते ते जीवन।

स्वप्नाच् आकाश अन धरती स्वप्नाची।

कल्पनांच्या जाणिवेतून उधळण स्वप्नाची।।



ते बालपण किती असमंजस होत।

ती दुनिया किति रंगतदार होती।

ते पावसाच्या पाण्यात खेळलेले जीवन

वाऱ्या च्या झोक्याबरोबर बागडणारे तन।।


ते झाडाच्या सावलीत खेळलेले खेळ

गोट्या कबड्डी कोया लपाछपी शिवाशिवी।

ती आईची माया,वडिलांचे प्रेम।

पळत होतो दोस्तांच्या हाकेला जीवानिशी।।



जबरदस्त उत्सुकता होती

ते बालपण बिलकुल वेडं होतं

प्रत्येक गोष्ट जाणून  घ्यायचा हट्ट होता

दुनियेचा खोटेपणा माहीत नव्हता।


ते बालपण बेभान होत

ते हृदय अनमोल होतं

नकळत निसटून गेलं ते बालपण

परत मिळेल कारे ते बालपण।।



Rate this content
Log in