STORYMIRROR

Sayli Kamble

Others

3  

Sayli Kamble

Others

बालमैत्रीण

बालमैत्रीण

1 min
1.4K

माझ्या बालपणातील तू एक अविभाज्य भाग आहेस,

माझ्या अनेक मिञ मैत्रिणींमध्ये

तू एक खास आहेस


तेव्हाही तुझ्याशिवाय खेळ कधी रंगला नाही,

आणि आजही गेट टुगेदरला तुझ्य़ाशिवाय मजा नाही


शाळेत तर आपण सगळेच गेलाे,

आता रमलोय आपआपल्या संसारात,

आम्हाला आठवतात काहीसे पुसट प्रसंग,

पण तंतोतंत आठवणी मात्र तुच अजुनही जपल्यास


तुझी स्मरणशक्ती पाहून खरच थक्क व्हायला होते,

तू आठवलेले सगळे क्षण पुन्हा जगण्यासाठी परत शाऴेत जावेसे वाटते


तुझी मित्रांना भेटण्याची तळमळ खरंच जाणवते,

शाळा हाच होता आयुष्यातील सर्वांत सुंदर टप्पा हे मीदेखील मानते


आपण सगळेच खूप बिझी झालोत आणि कायमच असू

पण थोडेतरी क्षण मोकऴेपणाने जगण्यासाठी आपण सगळे नक्की भेटू


Rate this content
Log in