बालकविता
बालकविता
1 min
237
शाळा कधी उघडेल?
मित्र कधी भेटतील?
मला घरात राहवत नाही
मला आता करमत नाही
घरात बसून कंटाळलोय
टीव्ही पाहून बोअर झालोय
रिकामं बसावं वाटत नाही
मला आता करमत नाही
शाळेची येतेय आठवण
घरात वाटतंय भणभण
एकट्याला मन रमत नाही
मला आता करमत नाही
होऊ दे शाळा लवकर सुरू
कोरोनाला निश्चितच मारू
मित्राशिवाय दिवस जात नाही
मला आता करमत नाही
