बालकाव्य
बालकाव्य
1 min
330
उंदीरमामा उंदीरमामा
तुम्ही आमच्या काय कामा?
सोसायटीत तुम्ही येता
सर्वत्र धुमाकुळ घालता.....
उंदीरमामा उंदीरमामा
तुम्ही आमच्या काय कामा?
घरात येवून तुम्ही बिळे करता
कपडे आमचे कुरतडून टाकता....
उंदीरमामा उंदीरमामा
तुम्ही आमच्या काय कामा?
पार्कींगमधील गाडीचे काय करता?
गाडीची वायर कुरतडून का तोडता?....
उंदीरमामा उंदीरमामा
तुम्ही आमच्या काय कामा?
कोट माझ्या बाबांचा फाडून टाकता
आवडीचे पुस्तक फाडून की हो टाकता.....
उंदीरमामा उंदीरमामा
तुम्ही आमच्या काय कामा?
तुमच्यासाठी आता आणलाय पिंजरा
राहा आता जपून जरा,जपून जरा...
