बालगीत.अंकगीत
बालगीत.अंकगीत
1 min
214
एक,दोन,एक ,दोन
आई हा बघ मेंदीचा कोन.....
तीन ,चार,तीन ,चार
वारा सुटलाय थंड गार......
पाच ,सहा,पाच ,सहा
मुलांनो फळ्याकडे पाहा.....
सात,आठ ,सात,आठ
चला मुलांनो बसा बर ताठ.....
नऊ, दहा, नऊ, दहा
चला, चला घरी शाळा सुटली पाहा....
अकरा,बारा,अकरा,बारा
मुलांनो वर्गातील कचरा गोळा करा.....
तेरा,चौदा,तेरा,चौदा
आज शिकूया करायला भाजीचा सौदा....
पंधरा,सोळा,पंधरा,सोळा
आपापली सामान करा बर गोळा....
सतरा,अठरा,सतरा,अठरा
जावू आपण पाहायला गावची जत्रा....
एकोणीस,वीस,एकोणीस ,वीस
किती, किती सुंदर आहे हे मोरपीस.....
