बाळाचे आगमन
बाळाचे आगमन
आजवरचे घर नुसते घर होते
इवल्याश्या पावलांनी ते सजले होते
जगाला विसरून ओठावर हास्य होते
बाळाच्या आल्याने आता रमले होते
बाळाच्या आगमनाची बातमी आली होती
सर्वांच्या ओठावर हसू गालावर खळी होती
घरातले सर्वजण आपले आशिष देत होते
शतायुषी व दीर्घायुषी अशी शुभेच्छा देत होते
बाळाच्या आल्याने सर्वांचे प्रमोशन झाले होते
कुणी आई बाबा तर कोणी मामा-मामी बनले होते
जेव्हा घरचे कोणी दु:खी होते
बाळासोबत खेळल्याने ते खुश राहत होते
बाळाच्या आनंदात आसमंत फुलू लागले
सुंदरशा त्याच्या कायेवर माया करू लागले
आजी आणि आजोबा सर्व लाड करू लागले
आत्या काका बाळाचा कौतुक करू लागले
