बाळ नामक बाप माणुस
बाळ नामक बाप माणुस
१९ जून १९६६ चा दिस उजडला
मराठी मातीत सेनेचा वाघ गरजला
एका राजकीय पक्षाचा नारळ फोडला
महाराष्ट्रात शिवसेनेचा सूर्य उगवला
अवघा आसमंत भगव्या रंगात नटला
बाळ नामक बाप माणसाने देश हलविला
सुरवातीला डाव्यांबरोबर लढला
हा पक्ष त्यांनी वसंतसेना असा हिणवला
हळूहळू मुंबईत जम बसविला
स्थानिकांच्या न्यायहक्कासाठी भांडला
सडेतोड़ अन प्रखर राष्ट्रवाद अंगिकारला
बाळ नामक बाप माणसाने देश हलविला
पुढे हिंदुत्वाचा मार्ग धरला
मुंबई महापालिकेचा गड जिंकला
समविचारी भाजप सोबत आला
अणि विधानसभेवर भगवा फड़कला
महाराष्ट्रात वेगळा इतिहास घडविला
बाळ नामक बाप माणसाने देश हलविला
आपला विचार निर्भीडपणे मांडला
हा बिंदास्तपणा विरोधकांनापण भावला
दसरामेळाव्याने दरवर्षी विक्रम मोडला
सामन्यातल्या लेखांनी महाराष्ट्र तापवला
महाराष्ट्राच्या तरुणांचा मार्गदर्शक ठरला
बाळ नामक माणसाने देश हलविला
१७ नोव्हेंबर २०१२ ला हा लढ़ा संपला
एका महान नेत्याला महाराष्ट्र मुकला
साहेबांनी अखेरचा जय महाराष्ट्र केला
त्यांच्या जाण्याने महाराष्ट्र पोरका झाला
निरोपासाठी लाखोंचा जन लोटला
बाळ नामक बाप माणसाने देश हलविला
