बाजार
बाजार
1 min
99
उगवत्या सूर्याच्या साक्षीनं
सरत्या क्षणांचा बाजार मांडतोय
खपळाल्या जखमांना पुन्हा पुन्हा गोजारतोय
शरीरभर पसरलेल्या नात्यांची वीण
उसवून उसवून पुन्हा पुन्हा घट्ट करतोय
श्वासात गुंतलेला तो गुलाबी काटा
ओंजळीत घेऊन त्याला गोंजारतोय
कधीतरी चांदण्यान भरलेलं आभाळ
पुन्हा पुन्हा आठवायचा प्रयत्न करतोराय
प्रकाशाच्या मैफिलीत तू गायलेली
भैरवी आज पुन्हा आठवतोय
उगवत्या सूर्याच्या साक्षीनं
सरलेल्या क्षणांचा बाजार आज मांडतोय
