बाबासाहेब
बाबासाहेब
बोधिसत्व म्हणजे बाबासाहेब
ज्ञानाचं अमरत्व म्हणजे बाबासाहेब
मानवतेची तळमळ म्हणजे बाबासाहेब
समतेची कळकळ म्हणजे बाबासाहेब
चंदनापरी झिजणं म्हणजे बाबासाहेब
सूर्यासारखं तळपून दुसऱ्यासाठी विझणं म्हणजे बाबासाहेब
अत्तदीप असणं म्हणजे बाबासाहेब
मनात मैत्रीभाव वसणं म्हणजे बाबासाहेब
अन्यायाचा प्रतिकार करणं म्हणजे बाबासाहेब
बुद्धाला अनुसरणं म्हणजे बाबासाहेब
गुलामाला गुलामीची जाणीव करून देणं म्हणजे बाबासाहेब
स्वतःच्या सुखाची पायमल्ली करून दुसऱ्यांची दुःख घेणं म्हणजे बाबासाहेब
समाजासाठी डोळ्यात अश्रू तरळणं म्हणजे बाबासाहेब
दुसऱ्याच्या दुःखाने हळहळणं म्हणजे बाबासाहेब
समाजपरिवर्तनासाठी आयुष्य वेचणं म्हणजे बाबासाहेब
मनुवादी मानसिकतेला ठेचणं म्हणजे बाबासाहेब
मनात स्वाभिमान जागवणं म्हणजे बाबासाहेब
ज्ञानाची शस्त्र पाजवणं म्हणजे बाबासाहेब
बाबासाहेब हा विचार आमच्या मनात रुजला पाहिजे
बाबासाहेब आम्ही अंगिकारला पाहिजे,
मनामनात पुजला पाहिजे
म्हणून म्हणतो,
बाबासाहेब एक क्रांतिकारी विचार
मित्रा, वेळ आलीय आतातरी स्वीकार...
