बाबाचे महत्त्व
बाबाचे महत्त्व
1 min
369
बाबांचा धाक मुलावर असतो,
इकडे जाऊ नको,
तिकडे जाऊ नको,
मुलांना बाबा रागीट आहेत असे वाटते,
मुलांना प्रिय आईच वाटते,
मुलाचे लाड करते, कुरवाळत,
बाबांना दुधावरची साय कधीच म्हणत नाहीत.
मग बाबा मेल्यावर मुले का ढसाढसा रडतात,
मुलांना पायाखालची वाळू घसरल्यासारखी वाटते,
घरांचे संपूर्ण ओझं मुलांच्या डोक्यावर येतं
तेव्हा कळते बाबा काय चीज असते ते
