बाबा
बाबा
1 min
1.2K
सुख नव्हतच कधी
त्यांच्या आयुष्यात दु:खाचा
अख्खा डोंगर साेसताना
मी त्यांना पाहीलं......
त्यांच्या प्रत्येक दु:खात
सहभागी हाेयाचं राहुन गेलं....
ज्या बापानी अख्ख आयुष्य
हे माझ्यासाठी वाहिलं
त्यांच्यासाठी काहीतरी
करायचं राहुन गेलं.....
बापाचं बाप पण
बघायचं राहुन गेलं....
अन् मी मिळवलेल्या
प्रत्येक यशाचं काैतुक त्यांच्या
हातुन व्हायचं राहुन गेलं......
