STORYMIRROR

Rohit Khamkar

Others

4  

Rohit Khamkar

Others

बाबा

बाबा

1 min
269

आयुष्य घातले देव शोधण्यात, ते घरीच होते.

माझ्या प्रत्येक अपयशाला, जे सावरीत होते.


मी जिंकण्यासाठी, माझ्यापेक्षा जास्त मेहनत केली.

मला वाटायच मी एकटाच जिंकतोय, म्हणून मस्करी केली.



माझ्या साठी ज्यांनी, स्वतःशीच पक्षपात केला.

प्रत्येक वेळी फसत गेलो, असा घात केला.



एवढ्या प्रवासानंतर सहज, मागे वळून पहिले.

धूसर अश्या प्रकाशात, चार हात आरोळी देऊन राहिले.



मी झोपल्यावर अंगावर चादर टाकणारे, हात आज कातरत आहेत.

तश्या अवस्थेत पुन्हा तीच चादर, अंगावर टाकत आहेत.



उशिरा समज आली मला, आहे तुमची एकसष्ठी.

तुम्हीच माझे पालक गुरु आणी देव, दिलीत तुम्हीच दृष्टी .


Rate this content
Log in