बाबा
बाबा
1 min
196
बाबा असतो वडासारखा,
मातीत घट्ट रुतून कुटूंबाला सावली देणारा,
स्वत: ऊन सोसणारा,
पण लेकरांच्या पंखात बळ देणारा,
कधी माय बनून झुला झुलविणारा,
तर कधी स्वत: च्या वहाणा,
लेकराला देणारा,
कुटुबाचे छत्र होऊनी,
मायेची सावली धरणारा,
प्रत्येक संकटाला सामोरे जाणारा,
मुलांच्या हाकेला धावून येणारा,
कुटूंबाला आधार देणारा,
घराचा मुख्य आधार असणारा,
बाबा, पिता ताता, पप्पा
