STORYMIRROR

Ashwini Jadhav

Others

3  

Ashwini Jadhav

Others

बाबा...

बाबा...

1 min
268

बाबा तू आहे किती अनमोल रत्न,

ज्याच्या प्रेमाला नाही कोणतं मोल...

कष्ट करतो दिवस आणि रात्र,

करून जिवाचे हाल...


फाटके कपडे घालून स्वतःला लपवीत,

लेकरांचे सारे स्वप्नं पूर्ण करीतो....

चिंता त्याला सर्वांची मात्र,

दुःख सारे पचवून घेतो...


बाबा तुला असते नेहमी हूरहूर,

जातील का चिमुकले तुझे उडून दूर...

जाईल लेक सासरी सोडून त्याला हीच भीती रोज, विचार येताच कोपऱ्या बसतो तो रडून...


तुझ्याविना बाबा जगणं आहे कठीण,

घाबरल्यावर मला कोण देईल धीर...

देवा मला जन्मोजन्मी लेक त्यांची होऊ दे, 

ठेव सुखी बाबाला हीच अपेक्षा तुझ्याकडे...


Rate this content
Log in