बाबा
बाबा
थोडेसे रागीट, थोडेसे प्रेमळ
स्वभावाने आहेत सदैव निर्मळ
समभाव अंगी बाळगणारे
ते आमुचे वडील आहेत!!धृ!!
मोठ्यांचा आदर करणारे
लहान- मोठे सम मानणारे
चुकीस आम्हाला समजून सांगणारे
ते आमुचे वडील आहेत!!१!!
मनात त्यांच्या ही एकच इच्छा
मुलांचे स्वप्न पूर्ण होवो ही सदिच्छा
त्यासाठी रात्रंदिवस झटणारे
ते आमुचे वडील आहेत!!२!!
मदतीस सदैव धावून जाणारे
कधीही कोणाचे मन न दुखवणारे
सर्वांमधे एकनिष्ठ वागणारे
ते आमुचे वडील आहेत!!३!!
तुम्ही केलेल्या अथक प्रयत्नांची
जाणीव आम्हास सदैव राहू दे
त्या प्रयत्नांची चीज होणे
ही हमी आमच्या मनात कायम राहू दे!!४!!
देवाकडे मागणे एक
सुखी ठेवो तुम्हाला
येणारे सुख:दुःख सहन
करण्याची शक्ती देवो तुम्हाला!!५!!
