बाबा
बाबा
1 min
214
आयुष्यभर केले कष्ट तू
दमला असशील ना बाबा
परिवारासाठी सतत राबला
सोडून स्वतःच्या मौजा
अपार परिश्रम करून
घडवलेस आम्हाला तू
आतातरी घे बाबा थोडीशी
क्षणभर तरी विश्रांती तू
मुली असल्याचा गर्व
तुला असे आमचा भारी
सांग ना बाबा करू रे कशी
या ऋणाची आम्ही उतराई
पुरवले आमचे सर्व बालहट्ट
पूर्ण केल्या सर्व गरजा
आईपेक्षाही वाटे बाबा
तू आम्हाला अधिक जवळचा
