STORYMIRROR

Bhagyashri Chavan Patil

Children Stories Inspirational

3  

Bhagyashri Chavan Patil

Children Stories Inspirational

बाबा तुम्हीच माझे विश्व

बाबा तुम्हीच माझे विश्व

1 min
279

तुम्हीच माझे गुरू आणि तुम्हीच 

आमच्यासाठी देव आहात..

तुम्हीच मायेची हाक तुम्हीच

आमच्यासाठी प्रेमाची सावली आहात..


तुमच्याशी नाते सुद्धा वेगळे आणि

तुम्हीच जगण्याचे बळ आहात..

तुम्ही पहिले मित्र आणि तुम्हीच

सुरक्षित वाटेल अशी हक्काची जागा आहात..


तुम्ही खूप शिस्तप्रिय आणि अबोल

आणि थोडेसे कठोर ही आहात..

पण फणासासारखे कठोर आणि आतून

मात्र गऱ्या सारखे खूप गोड आहात..


तुम्ही आणि फक्त तुम्ही आमचे असे

हक्काचे लाडाचे प्रेमाचे बाबा आहात..

सगळ्यात जास्त प्रेम जास्ती काळजी 

करणारे बाबा तुम्ही आहात..


तुम्ही केलेल्या कष्टाची जाणीव आहे

आणि अभिमान वाटेल असे तुम्ही आहात..

तुम्ही केलेल्या संस्काराची शिदोरी ही आहे

आणि ती जपुन ठेवायला तुम्ही आहात..


तुम्ही खूप बोलत नाही हे सुद्धा माहीत आहे

तुम्ही किती आणि केलं आहे ते ही तुम्हीच आहात..

आमच्या स्वप्नांना नवीन पंख मोकळं आकाश ही

तुम्हीच करून दिलं आहे तुम्ही जास्त महत्वाचे आहात..


Rate this content
Log in