STORYMIRROR

Manisha Awekar

Others

3  

Manisha Awekar

Others

बाबा मला माफ करा

बाबा मला माफ करा

1 min
208

बाबा माझ्या अभ्यासाला 

तुम्ही अग्रक्रम दिले

अभ्यासाच्या जोडीलाच

कलागुण शिकविले


हात प्रेमळ सदैव

असे माझ्या पाठीवरी

चढे लेक प्रगतीच्या 

पायऱ्याच वरवरी


अभ्यासात मन माझे

परीक्षांचे भय वाटे

शब्द देता आधाराचे

मनातले भय फिटे


माझी परीक्षा संपता

बेत कितीक रचले

आनंदात परतता

अघटित हो घडले


कसा अचानक आला

तीव्र हृदय झटका

केले होत्याचे नव्हते

बसे मनाला चटका


खरे वाटत नव्हते

मजपुढे वाढलेले

बाबा मला माफ करा

दुःखावेगे ओरडले


नाही काही सेवा केली

नाही तुम्हां रिझविले

कल्पवृक्ष कन्येसाठी

लावुनिया बाबा गेले


किती बेत केले होते

तुम्हांलागी सुखवाया

गेले सर्वचि लयासी

बाबा मला माफ करा


Rate this content
Log in