बाबा माझा असा...
बाबा माझा असा...
तू असा विनाकारण रागावतोस
अन् मी तशी मस्करीत मनवते
आपल्या मनासारखं नाही झालं
की दोघंही घालतो किती रे गोंधळ
बाप वैसी बेटी रोजच रे ऐकतो
तरीही मोठ्या मनानं मानात जगतो
आईची बोलणीही चुपचाप ऐकतोस
फक्त माझ्याचसाठी तू झेलतोस
आजोबांचा जीव तुझ्यापेक्षा माझ्यात
तेव्हा जळतो तुझा बापलेकाचा जीव
किती रे रुसतोस माझ्यावर कधी
मात्र एका सॉरीने तुझीच होते फजिती
माझ्यापेक्षा तूच दुराव्याने हळहळतोस
किती रे प्रेम तू तुझ्या परीवर करतोस
परीची नेहमीच असते तुला काळजी
मला मात्र तुझ्या काळजाची काळजी
बाबा माझा असा... जीव ओवाळून टाकावा...
