STORYMIRROR

MITALI TAMBE

Others

4  

MITALI TAMBE

Others

अवकाळी पाऊस

अवकाळी पाऊस

1 min
750

अवकाळी पावसानं कशी केली बघा दैना

काय होईल पिकाचं डोळा डोळ्याला लागना

पाणी ढगातून नाही माझ्या डोळ्यातून वाहे

थाटामाटात लगीन लेकीचं हो आता राहे


माझ्या लेकीचं सासर मोठं तोलाचंमोलाचं

नाही कशाची ददात , घरदार ते मानाचं

हौस जावयाची माझ्या पूर्ण करायची आशा

अवकाळी पावसाने केली पुरती निराशा


झाले नुकसान फार, गेली वाहून कमाई

या वरशी वाटलं माझी हसेल काळी आई

पिक जोमानं वाढलं सारं आवार फुललं

अवकाळी पावसानं माझं नशीबच नेलं


पर लेक माझी शानी, म्हणे नका करू त्रागा

बाबा, आमच्याकडं बघा अन धीरानं हो वागा

तुम्ही कुटुंबप्रमुख, तुम्हीच आमचा आधार 

अवकाळी पावसानं करू नका आम्हां निराधार


Rate this content
Log in