अविस्मरणीय दिवस
अविस्मरणीय दिवस
1 min
402
चुलत बहिणीची मैत्रीण
पाहुणी म्हणून आली
ओळख नसली तरी
मिळून मिसळून वागली
नाश्ता केला गरमगरम
मसाला चहापण घेतला
पाहुणीनी माझ्यापुढे
मॅटिनीचा प्रस्ताव टाकला
सिनेमात रमून गेलो
कळलेच नाही कधी संपला
मसालेडोसा खाऊन
प्रदर्शनाचा रस्ता धरला
प्रदर्शन बघून आरामात आलो
गप्पागोष्टींमधे रमून गेलो
चुलतबहिणीशी फोनवर बोललो
दिवस मजेत गेला सांगतच राहिलो
