अतूट नाते...
अतूट नाते...
नाते जुळले आपले माझ्या जन्मानंतर
मोठ्या भावाची पदवी मिळाली तुला त्यावर
लहान बहीण म्हणून मी आले तुझ्या आयुष्यात
आणि मग सुरु झाला आपला नात्याचा प्रवास
लहान म्हणून लाड केले माझे तू
कुठेही गेल्यावर खाऊ आणण्यास विसरला नाही तू
अभ्यास शिकवताना माझा गुरु झालास
मस्ती केल्यावर ओरडाही दिलास
माझ्या गालावरच्या रागाला हसत हसत पळवलंस
थट्टा मस्करीत आनंदात बालपण घालवलंस
कधीच पाहिले नव्हते तुझ्या डोळ्यात अश्रू
मी सासरी जातेवेळी लहान मुलासारखा रडत होतास तू
तेव्हा तू मोठा नव्हतास
विरहाने तू बिथरलेलास
तरी तू मला म्हणालास "डोन्ट वरी ऍम अल्वेस देअर"
आणि आपल्या नात्याने बांधला अतूट असा घेर