अतूट बंध
अतूट बंध
1 min
255
नाते असो कोणतेही
विश्वासाने जोडुया
बांधुया रेशीम बंध
आजन्म तयास निभवूया
समर्पण असते त्यात
त्याग असतो महत्वाचा
शुध्द होते नाते त्याने
कस लागतो सहनशीलतेचा
समजून समजणे
जगणे आणि जगू देने
दुर्गुण दुर्लक्षिने
हे भाव असावे अंतकर्णाने
सुखात अनुभवा सरी
दुःखात पुसा अश्रूंच्या धारी
मार्ग दाखवा प्रगतीचा
विश्वास असावा ईश्वरावरी
नाते जपा मैत्रीचे
नाते असो कोणतेही
त्यात असावा प्रेमभाव
तार मनाच्या जुळूद्या
काय वर्णावे नाते
नाते हे नात्यापलिकडचे
सोडुया फक्त अहंकार
मोती जुळतील सुंदर माळेचे
