अतुट नातं घनिष्ठ मैत्रीचं
अतुट नातं घनिष्ठ मैत्रीचं
पंधरा वर्षांपासून जुळूनी आले
तुझे नी माझे मैत्रीचे ऋणानुबंध
कितीही संकटे आली तरी
तुटणार नाहीत हे रेशीम बंध
कितीही अडचणी आल्या
तरी धावून येतेस माझ्यासाठी
चंदनाप्रमाणे झिजते माझ्यासाठी
मला मधुगंध मिळावा म्हणून
मेणबत्तीप्रमाणे चटके सहन करते
मला शुभ्र प्रकाश मिळावा म्हणून
हृदयामध्ये ठेऊनी तुझीच प्रतिमा
नित्य पुजीते तुला मी
देवरुपाने भेटलीस तू मला
मग कशाला हवा देव्हारा
तू नेहमी हसत रहा
काळाच्या पडद्याआड गेलेल्या
गोष्टींना विसरुन जा
आनंदाने तू गरुड भरारी घे
तुझ्यावाटे येऊ नये दुःख
हीच एक मागणी ईशचरणी
जरी तुझ्या वाटे आले दुःख
नयनी उभे राहिले अश्रू
तुझी ही मैत्रिण येईल पुसाया आसवं
