अटलजी !
अटलजी !
विचार आणि ध्येयावरती ठेवून अविचल निष्ठा
दिली मिळवूनी राष्ट्राला या आपण जगी प्रतिष्ठा
पारदर्शी हे जीवन अवघे हरेक पाऊल ठाम
राजकारणामधील अटलजी वंदनीय श्रीराम
सरस्वतीचा आशीर्वादही वक्तृत्वाला खास
कोट्यवधी कानांतून घुमती शब्दही तासनतास
कर्तृत्वासह नेतृत्वाला दिले छान पितृत्व
दानही केले निवास आपण अफाट हे दातृत्व
धर्म संस्कृती संस्कारांची ध्वजा सदा पेलली
कणखर राहून किती प्रसंगी आव्हाने झेलली
विरोधकातील भलेपणाला दिली खुलुनी दाद
अटल मार्ग हा जगास शिकवी छान मधुर संवाद
पत्रकार अन् कवी आगळा कोटी हृदयी स्थान
भारतरत्नही चालत आले करण्या तव बहुमान
भाग्यवंत मी दर्शन झाले आणि श्रवण साक्षात
पुन्हा अटलजी होणे नाही कुठल्याही पक्षात!
