अठरा एप्रिल (18)
अठरा एप्रिल (18)
चौथा दिवस छान उगवला....!
चौ कशी करण्या फोन करता
था ट त्याचा दुणावला होता
दि वस माथ्यावर आला असता
व ग घोरण्याचा चालू होता...
स रसकट टाळणे
छा न जमते त्याला
न उचलताच फोन
उ घडणे डोळे कळते त्याला....
ग रळ सारी नकाराची
व सकन फेकणे चालते त्याला
ला ज नाही मित्रांना
हे ही चांगलेच उमजते त्याला...
आज दिवस वेगळा होता
फोन गजरासाठी वाजत होता
याचा कयास चुकला होता
जेव्हा चहाचा कप समोर आला होता...
म्हणे उठा आता चहा घ्या
आजही सुट्टीच आहे बाबा
आता तरी थोडे आवरा
सुटत चाललाय आमचा ताबा...
म्हटले
चौथा दिवस छान उगवला
जणू चहा आम्हीच मागवला
काळ असा कसा बदलला
ज्याने जीव खरेच सुखावला.....!
