अथांग आकाश
अथांग आकाश
1 min
23.4K
दोन क्षणासाठी डोळे
जेव्हा सहज मी मिटतो
कधी सूर्योदय कधी सूर्यास्त
मग आपलासा वाटतो
आकाशात या तारे इतके
कुण्या शहाण्याने खोवलेले
की बसलेत ऋषीमुनी तिथे
कधी अंतर्धान पावलेले
किती गुपित झाले गडप
त्यात नाही तमा आकाशाला
पुरेल कुठवर अस्तित्व आपले
नाही माहित त्या प्रकाशाला
पसरलेला अथांग, नाही
कळत कुठली त्याची सीमा
काळजीत त्याचे नाही का
काढला कुणी माणसानं विमा
असेल का तिथे पण कुणी
राजा, कुणी रंक बनलेले
की असेल कुणी कोळी
जाळे ज्याने हे विणलेले