अस्तित्व...
अस्तित्व...
1 min
272
हरवलं आहे माझं अस्तित्व कुठे तरी...
येता जाता चुकाच दाखवतात भारी...
बऱ्या कार्याचं कौतुक नाही...
एका चुकीला माफी नाही...
सुनावलं जातं एवढं की काळजाचं होतं पाणी...
स्वत:च्या हिंमतीवर कमवलेले अस्तित्व हरवलं कुठे
तरी...
कोणीही येतं बोलून जातं...
कमी पणाचा वार ही करतं...
तेव्हा विसर पडतो त्यांना माझ्या चांगल्या कामाचा...
अस्तित्व होतं माझं स्वत:चं कधीतरी...
आता नाही उरलं काही...
स्वाभिमान मात्र माझा पिळवटला सर्वांनी...
