अस्तित्व
अस्तित्व
1 min
162
जीवनभर मी माझं अस्तित्व
टिकवण्यासाठी धडपडलो
निदान शेवटी तरी
मिळू द्या मला समाधान
म्हणून म्हणतो
मी गेल्यावर
थोडेसे सारवून
पीठ पसरवा काहीसे
त्यावर ठेवा
एक तेवत राहणारा दिवा
निदान दहा दिवसांसाठी
माझं नसलेलं अस्तित्व
टिकवण्यासाठी...
माझ्या तुझ्या
समाधानासाठी
शेवटी शेवटी...
