अस्तित्व
अस्तित्व
1 min
345
इथेच झाल्या जिजाऊ, इथेच झाल्या सावित्री.
आताच्या युगात मात्र मुली, गर्भातच मरती.
उभ्या आहोत सगळीकडे, लाऊन खांद्याला खांदा.
सतत अवमान पदरी, फक्त मान द्या आम्हा साधा.
आई बायको बहीण लेक, नात्यांच्या पलीकडे बघा.
प्रत्येक स्त्री ला बाकी काही नको, फक्त आमचा स्वाभिमान हवा.
आमचीही स्वप्न आहेत, भरारी आम्हा घेऊ द्या.
जगण्याच्या या गर्दी मध्ये, आमचे अस्तित्व आम्हा मिळू द्या.
