अस्त
अस्त
केव्हा, कधी होणार जीवनाचा अस्त,
हे कोनालाच माहित नस्त.
म्हनुण सदैव रहा मस्त,
जीवनातील समस्या होतील पस्त.
जीवन आनंदी रहावे म्हणुन व्हावे व्यस्त,
संगीत,नाच-गाणे, नाटकाशी व्हावे व्यस्त.
जीवनात असावी थोडी सिस्त,
जीवन जगनं मगं वाटते मस्त.
मित्र असतात बुध्दीबळाचे पादे,
ते नेहमीच पूर्ण करतात आपले वादे.
नवीन-नवीन सबंध हमखास बनवावे,
मानवाने मानवाला मानवी साखळीने जोडावे.
कोनी काही नसतात जगात आगळे-वेगळे,
मानसाने मानसाशी राहावे एकदम मोकळे.
धन संपदा नाही देनार तुम्हाला अमरत्व,
मग धन प्राप्ती साठी कां सोडता तत्व.
विश्र्वच माझे घर, हेच खरे सत्य,
सोडुन सारी मोहमाळ्या समजा जीवनाचे सत्य.
केव्हा, कधी होणार जीवनाचा अस्त,
हे कोनालाच माहित नस्त.
