अष्टाक्षरी
अष्टाक्षरी
1 min
14.6K
आई एक गुरू असे
जन्म घालिते बाळास
देते उदरातूनी या
सर्वस्वाचा सुधा रस।।१।।
स्नेह येई धारातूनी
दुग्ध या अंतरातूनी
अमृताला या प्राशुनी
तृप्त झाले मी मनी ।।२।।
आई माझी गुरू छाया
असे वात्सल्याची खाण
मला मोठे करताना
झिजलीया क्षणक्षण ।।३।।
देवाहून महा आई
तूच जगातसे काही
स्वर्ग पदरात आई
दिसे मजला स्वदेही।।४।।
संग बाळाला आईचा
धीर या संकटातूनी
स्तंभ आधाराचा देई
वाचविते काट्यातूनी।।५।।
बाळज्योत होऊनिया
राही सदैव तेवत
तुझी थोरवी गाण्यास
मज शब्द सुचेनात ।।६।।
