असं वेड लावू नकोस मला
असं वेड लावू नकोस मला
असं वेड लावू नकोस मला
काळीज चिरून जात आहे
सारं विश्वच तूझ्या आठवणीत
आता विरून जात आहे ||0||
कधी मांडीन हिशोब तुझ्यासमोर
किती दुःख प्लस झाले
उधळली प्रेमाची फुले तुझ्यावर
चैन कधीच मायनस झाले
सतत अशांत मनात आता
तूच फिरून जात आहे
सारं विश्वच तूझ्या आठवणीत
आता विरून जात आहे ||1||
तुला कळतील भावना माझ्या
अपेक्षाही मी करत नाही
कैफ तूझ्या प्रीतीचा काही
केल्या आता ओसरत नाही
हृदय तूझ्या वेदनेने माझं
आता पिळून जात आहे
सारं विश्वच तूझ्या आठवणीत
आता विरून जात आहे ||2||
व्यक्त कराव्या वाटतात भावना
मनात माझ्या दबलेल्या
दाखवाव्याशा वाटतात तुला
जखमा हृदयी दडलेल्या
काळीज माझं बघ जरा
कसं पिंजून जात आहे
सारं विश्वच तूझ्या आठवणीत
आता विरून जात आहे ||3||
