असं एक वादळ शमलं
असं एक वादळ शमलं
शतकानुशतकाचं मनुवादाचं भूतही
ज्याच्या चरणी नमलं
असं एक वादळ शमलं
असं एक वादळ शमलं ||0||
ज्या मनुवादानं मानवताच
गुलामगिरीत जखडून टाकली
अशा यंत्रणेची पाळमुळंच
भीमरावानं उखडून टाकली
विद्वानांचं तत्वज्ञानही
ज्याच्या विद्वत्तेसमोर नमलं
असं एक वादळ शमलं
असं एक वादळ शमलं ||1||
सूर्यासारखा स्वयंप्रकाशित
तो जन्मभर राहिला
आम्ही तर आमचा बुद्धच
भीमरावात पाहिला
बुद्धाच्या अगाध तत्वज्ञानात
ज्याचं मन रमलं
असं एक वादळ शमलं
असं एक वादळ शमलं ||2||
त्या अफाट विद्वत्तेला उपमा काय द्यावी
हेच समजत नाही
अजूनही त्याच्या ज्ञानाचं
अगाध स्वरूपच उमजत नाही
कोणालाही ज्याचा
पराजय करणं नाही जमलं
असं एक वादळ शमलं
असं एक वादळ शमलं ||3||
