अस्मानी रंगाचं फुल
अस्मानी रंगाचं फुल
1 min
142
अस्मानी रंगाचं फुल होतं पाहिलं,
काल होती कळी, आज उमललं,
इथंच कुठं होतं, पडलय का?
पायाखाली दबून, चिरडलय का?
काल म्हणे, भ्रमर येणार होता
गंध हलके हलके, दरवळणार होता
पराग कण गुंफून, परतणार होता
फुलासवे हितगुज करणार होता
फुलाच्या मनी काही दडलय का?
इथंच कुठं होतं, पडलय का?
गेलं कुठे फुल आज, समजत नाही
प्रीतीची रित काही उमजत नाही
खुलणारी कळी झणी कोमेजत नाही
नीळीशार पाकळी का सजत नाही
मनी हुरहूर लावण्याचं अडलय का?
इथंच कुठं होतं, पडलय का?
