अश्विन प्रतिपदा
अश्विन प्रतिपदा
1 min
304
अश्विन प्रतिपदा
माझ्या अंबाची,
जाई जुई मोगरा,
फुले आईची.
उंच डोंगरावरी,
शोभा कुणाची,
आई भवानी,
माझी तुळजापूरची.
हळदी कुंकू,
मळवट,शोभला,
माझ्या अंबाचा,
पहिला उपवास,
बहु आवडीचा.
हिरवागार शिवार,
झाला,
तरवाडाची झाडं,
फुलून फुलून,
फुले त्याला आली,
पिवळ्या सोन्याची,
पाकळी लागली.
आसनावरी बसा,
आंबा,
घालते दंडवत,
व्रत करता आई,
तुझं
घट तुळजा,बसलं.
उदे उदे बोला,
आंबा,
देऊळात गर्दी,
भक्त तुझा,
आला सारा,
माथा चरणावरी.
