अश्रूंची कथा
अश्रूंची कथा
1 min
402
कधी सुखाचे,
कधी दुःखाचे
कधी प्रेमाचे,
कधी विरहाचे ...
कितीक भावना,
कितीतरी प्रकार...
कधी बनवतात हळवं,
कधी लाचार...
आनंदाश्रू सांगतात,
सुखाची कथा...
दुःखाश्रू सांगतात ,
उदासिची व्यथा...
ओघळता हे गालावरती,
भासती जसे टपोरे मोती...
ओल्या नेत्रकडा मधूनी,
टपकन कसे खाली उतरती...
होते कधी प्रेमळ बरसात,
कधीतरी गुदमरतो श्वास...
पण एक मात्र खरं,
भावनांना मिळते मोकळी वाट.
