अश्रू
अश्रू
1 min
252
ओथंबलेल्या भावनांनी
कंठ आलाय दाटून
भावनांच्या अलवार धक्याने
अश्रू ही गेलेत गोठून।।
शब्द होतात मुके
अक्षरांची होते घालमेल
भावनांच्या या जगात
नसतो कोणाचा ताळमेळ।।
अश्रू कधी सुखाचे
बनतात कधी दुःखाचे
व्यक्तीं प्रमाणे बदलतात
त्यावर अधिकार कोणाचे?।।
