STORYMIRROR

Sakharam Aachrekar

Others

4  

Sakharam Aachrekar

Others

अश्रू तुझ्या विरहाचे...

अश्रू तुझ्या विरहाचे...

1 min
944

सरलं एक वर्ष अजून, तुझ्या आठवणीने भरलेलं

तुझ्या सहवासाचं स्वप्नं होत, त्याच्या अंती उरलेलं...


या वर्षाच्या उगमासह, कळी आपलीही खुललेली

मनी माझ्या फुले सुगंधी, तुझ्याचसाठी फुललेली

आठवते मज रात्र धुंद ती, तुझ्या विचारी सरलेली

शांत रात्री त्या स्मरली सहज, तुझी स्वप्नं उरलेली

शेवटच्या दिवशीही मन अजून तुझ्या अश्रूंनी ओथंबलेलं...

तुझ्या सहवासाचं स्वप्नं होत, त्याच्या अंती उरलेलं...


माध्यान्ही या वर्षावर, तुझ्या मैत्रीची बहर

शुष्क मनाच्या रुक्ष तीरावर, क्षण एक प्रेमलहर

सजवलेलं कोपर्‍यात ह्दयाच्या, मी आपल्या स्वप्नांचं शहर

पसरवलसं त्यावर तू शेवटी, तुझ्या नकाराचं गरळं

त्या क्षणाला जवळपास माझं, आयुष्य सार सरलेलं...

तुझ्या सहवासाचं स्वप्नं होत, माझ्या आयुष्याअंती उरलेलं...


मिळाला होता एकतर्फी प्रेमाला, माझ्या जणू तुझा शह

सहन करायचाय या जीवनी, फक्त तुझा विरह

एक एक दिवस मोजता मोजता करत, उरलेल्या आयुष्याशी तह

दूर जातोय तुझ्यापासून, ह्दयात रुतलेल्या काट्यांसह

प्रेमसागरात माझ्या ह्दयाच्या, शोधतोय तुझं प्रतिबिंब विरलेलंं...

तुझ्या सहवासाचं स्वप्नं होत, त्याच्या अंती उरलेलं...


अखेरच्या या क्षणात एवढंच तुला सांगेन

तुझ्या आयुष्याला पुन्हा माझ्यासाठी मागेन

येता परतून तू पुन्हा तुझ्या स्वप्नी रंगेन

नाकारशील पुन्हा तर नकळत तुझ्या मृत्यूला बिलगेन

उरलंय एक कोडं अजून माझ्या मृत्यूलाही न सुटलेलं...

तुझ्या सहवासाचं स्वप्नं होत, माझ्या मृत्यूअंती उरलेलं...


Rate this content
Log in