STORYMIRROR

Shital Yadav

Others

3  

Shital Yadav

Others

अशी असावी कविता

अशी असावी कविता

1 min
29K


अशी असावी कविता

ठाव मनाचा घेणारी

शब्दांतून जीवनाला

नव आकार देणारी


अशी असावी कविता

भावनांना गुंफणारी

विचारांना देई दिशा

झेप गगनी घेणारी


अशी असावी कविता

मान स्त्रीचा करणारी

ज्योती सावित्रीसारखी

मनोमनी तेवणारी


अशी असावी कविता

देशप्रेम जपणारी

सर्वधर्म समभाव

माणुसकी सांगणारी


अशी असावी कविता

रुढी प्रथा मोडणारी

आत्मज्ञान विज्ञानाने

माणसाला जोडणारी


Rate this content
Log in